गणेश चतुर्थी 2024 शुभेच्छा- Happy Ganesh Chaturthi Marathi Wishes
गणेश चतुर्थी शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathi | Ganesh Chaturthi Quotes in Marathi | Ganesh Chaturthi chya Hardik Shubhechha | Ganesh Chaturthi Whatsapp Status images
गणेश चतुर्थी 2024 च्या शुभेच्छा :-गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या मित्र नातेवाईकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि गणेश चतुर्थी कोट्स मराठी , गणेश चतुर्थी विशेष इन मराठी आणि गणेश चतुर्थी संदेशाद्वारे शुभेच्छा देऊ शकतात. या लेखामध्ये गणेश चतुर्थी कोट्स आणि गणेश चतुर्थी स्टेटस इमेजेस मिळतील.
Happy Ganesh Chaturthi 2024 Wishes , Quotes & Status images :- गणेश चतुर्थी या वर्षी 11 सप्टेंबर पासून साजरा केला जाणार आहे. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात.त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात,गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. गणेशोत्सवाच्या वेळी गणपतीबाप्पाची आई आणि भगवान शिवाची पत्नी गौरीला आवाहन केले जाते ज्येष्ठा गौरी पूजन , महालक्ष्मी पूजा गौरी पूजा असे म्हटले जाते
साधारणत: गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीला साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार गणेश चतुर्थी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते. गणेशाची पुजा सर्व देवतांमध्ये प्रथम केली जाते. पंचांगानुसार गणेशाचा जन्म मध्याना च्या काळातील असल्याने गणेश पूजेसाठी माध्यमाचा काळ अधिक योग्य मानला जातो. गणेश चतुर्थीच्या या विशेष सणाच्या निमित्ताने आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना गणेश चतुर्थी शुभेच्छा , Ganesh Chaturthi Wishes in Marathi , Ganesh Chaturthi Quotes in Marathi , Ganesh Chaturthi chya Hardik Shubhechha ,Ganesh Chaturthi Whatsapp Status images द्वारे शुभेच्छा देऊ शकता.या लेखात गणेश चतुर्थी 2021 कोट्स मराठी आणि गणेश चतुर्थी स्टेट्स इमेजेस(फोटो) मिळतील.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
देशाला मुक्त करा हीच तुझ्या चरणी प्रार्थना
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख,समृद्धी,शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते
कुणी म्हणे तूच गणपती,विद्येचा तू अधिपती!
कुणी म्हणे तुज वक्रतुंड, शक्तीमान तुझे सोंड!
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
फुलांची सुरुवात कळी पासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपल्या कामाची सुरुवात
श्रीगणेशा पासून होते
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे
गणेश चतुर्थी कोट्स मराठी | Ganesh Chaturthi Quotes in Marathi
बंद होऊ दे ही कोरोना ची वार्ता
नाद घुमू दे एक पुन्हा
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदरा चा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होती उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणपतीच्या मंदिरात प्रसादला असते
मोदकांची गोडी
सुखी ठेव बाप्पा आमची ही जोडी
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला,
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते,
गणेशाच्या आधारावर जे काही जातात,
त्यांना नक्कीच काहीतरी मिळते,
आज पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपति राया आपणा सर्वांना
सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो
अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
या वर्षी पुन्हा येईल बाप्पा
येऊन थोडंसं बुचकळ्यात पडेल
नेहमीच्या ठिकाणी आलो का काय मी
असे विचारून स्वतःलाच चिमटा काढेल
गणेश चतुर्थी 2021 च्या शुभेच्छा | Ganesh Chaturthi chya Hardik Shubhechha
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत-गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी आम्हाला
गणराया तुझ्या येण्याने
सुख,समृद्धी, शांती आरोग्य लाभली
सर्व संकटांचे निवारण झाले
तुमच्या आशीर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे...
देव येतोय माझा...
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
उजळली ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरून
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
गणपतीच्या आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आनंदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
गजानन तू गणनायक
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी..
अन् उरसी तुच ठायी ठायी
जन्माची एसे हजारो व्हावे
ठेवीन या मस्त तुझ्या पायी
कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी आनंद
शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी केवडा,
दूर्वा, जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!
गणेश चतुर्थी स्टेट्स इमेजेस फोटो (Ganesh Chaturthi Whatsapp Status images )
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी…
चौसष्ट कलांचा स्वामी हा
भाग्यविधाता कलात्मक तेचे दान द्यावया
आलाय आज विघ्नहर्ता
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||
गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||
रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो "मोरया" तुझ्यामुळे..!
दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
तुमच्या आयुष्यातला
आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुझं नाव ओठांवर असेल
ज्यादिवशी तुझं नाव माझ्या
ओठांवर नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्याजवळ असेन
सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
बाप्पा एक तूच आहेस
जो सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधीच सोडत नाही
श्रावण सरला भाद्रपद चतुर्थी
ची पहाट आली सज्ज फुले
उघळायला गणाधिषा ची स्वारी आली
येतील गणराज मुषकी बैसोनि
स्वागत करूया त्यांची हासोनी
आनंदे भरले घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशीर्वाद सेऊन मोदका
कळवा तुमच्या इच्छा लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्यवेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना समृद्धी देवो आपले बाप्पा गणपती
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष,उल्हास, सुख, समृद्धी,
ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे..
हेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
Ganesh Jayanti Wishes in Marathi
Raksha Bandhan Quotes In Marathi
0 Comments: