दीप अमावास्या 2023: deep amavasya wishes in marathi
दीप पूजनाच्या शुभेच्छा, deep amavasya wishes in marathi, दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
Deep Puja 2023 Wishes: चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला 'दीप अमावस्या' (Deep Amavasya) म्हणतात. श्रावण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील अमावस्या हि दिप अमावास्या म्हणून साजरी केली जाते,त्यामुळे आजच्या दिवशी महाराष्ट्रात 'दीप अमावस्या' (Deep Amavasya) साजरी केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला 'आषाढ अमावस्या' (Ashadhi Amavasya) म्हणतात. याच दिवशी दीप पूजन (Deep Puja 2023केले जाते
भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते. यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले जातात. त्यांची पूजा केली जाते. घरात सर्वत्र दिवे लावून आषाढ अमावस्या साजरी केली जाते पुरणाचा नैवेद्य केला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तसेच आपल्या घरातील लहान मुलगा अथवा मुलगी या दिवशी ओवाळले जाते
दीप अमावास्या शुभेच्छा 2023:- तिमिरातून तेजाकडे असा संदेश देणारा अशी दिव्याची ओळख आहे. आजच्या प्राप्त परिस्थितीत सगळ्यांनाच अशा प्रतिकात्मक दीप पूजनाची गरज आहे. त्यामुळे आजच्या दीप पूजनातून सर्वांना अंधकारमय परिस्थितीशी लढण्याचा बळ मिळो.सध्याच्या डिजिटल युगात आपल्याकडे प्रत्येक सणांच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे आता आपल्याला दीप पूजनाच्या देखील शुभेच्छा आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून मिळतील. अशावेळी आपण देखील आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना Whatsapp, facebook यांच्या माध्यमातून दीप पूजनाच्या शुभेच्छा, deep amavasya chya shubhechha, दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा, deep amavasya wishes in marathi, दीप पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा, deep amavasya quotes in marathi, देऊ शकता. यासाठी आपण SMS, Images पाठवू शकता.
पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य: शांतीचे
स्वागत घरोघरी होऊ दे...!
आज दीप अमावस्या दीप पूजनाचा दिवस.
अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करून
हा दिप आपले जीवन सर्वाथाने उजाळो
हीच शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद, नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
तिमिरातुनी तेजाकडे ने
दीपदेवा जीवना||
" दिव्याने दिवा लावत गेलं कि
दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार होतो..
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की
"माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।
दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ||
अमावास्या गताहारी दीपतेजसमन्विता ।
रक्षेत् विदूषयेन्नैव चातुर्मासपवित्रताम् ॥
आज दीपतेजाने समन्वित
(गत आहारी) = गताहारी म्हणजेच
आहार संयमनाच्या संकल्पाने
पवित्र अशी दीप अमावास्या.
चेष्टेचा विषय न करता त्याची पवित्रता जपावी.
॥ दीपज्योति: नमोऽस्तुते ॥
दीप ज्योती: परब्रम्हा
दीपज्योतीजनार्दनः ।
शुभम करोति कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा
शत्रु बुद्धी विनाशाय
दीपक ज्योती नमोस्तुते
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश.....
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश.....
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश...
दीप आमवास्येचा सण खास !!!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.....
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर चंदनाचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिप अमावस्येचा..
सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन,
ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य: शांती व सौख्याचा
प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी
मनापासून प्रयत्न करा.
सर्वांच्या घरी
सुख, शांति चे लक्षदीप
सदैव तेवत राहो।
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा ।
लख लख तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या दिप अमावस्येला!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा ।
लक्ष लक्ष दीप उजळती येई
हसत ही दिप अमावास्या
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरुनी !
दीप अमावस्या निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
सर्वांच्या जीवनातील अंधःकार नष्ट होऊन
ज्ञान, आरोग्य, सौख्याचा प्रकाश
जिवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..!
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी
पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती !!!.
दीप आमवास्येचा हार्दिक शुभेछा.!!
0 Comments: