भगवद् गीता सुविचार - Bhagavad Gita Quotes In Marathi
भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi | भगवत गीता विचार मराठी | Bhagavad Gita Thoughts In Marathi | आनंदावरील गीता उपदेश मराठी | Bhagavad Gita Quotes In Marathi On Happiness | भगवत गीता श्लोक मराठी | Bhagvad Gita Shlok In Marathi | भगवद् गीता यशावरील सुविचार | Bhagavad Gita Marathi Quotes On Success
" भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi " या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला भगवत गीता श्लोक मराठी , Bhagvad Gita Shlok In Marathi , भगवद् गीता सुविचार , Bhagavad Gita Quotes In Marathi , भगवत गीता विचार मराठी , Bhagavad Gita Thoughts In Marathi
सादर केले आहेत, जे श्रीकृष्णाने महाभारताच्या रणांगणात अर्जुनाला सांगितले होते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भगवद्गीतेचे हे श्लोक अमृतासारखे आहेत. जी व्यक्ती आपल्या जीवनात भगवत गीता श्लोक मराठी , Bhagvad Gita Shlok In Marathi , भगवद् गीता सुविचार , Bhagavad Gita Quotes In Marathi , भगवत गीता विचार मराठी , Bhagavad Gita Thoughts In Marathi , भगवत गीता श्लोक मराठी , Bhagvad Gita Shlok In Marathi , भगवद् गीता यशावरील सुविचार , Bhagavad Gita Marathi Quotes On Success चे पालन करते त्याचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व चांगले असते.
भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi
भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही कालातीत असून, आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते.मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आहे. यासाठीच जाणून घ्या हे भगवद् गीता सुविचार | Bhagavad Gita Quotes In Marathi
1.जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे.
2. मनाच्या शांती शिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही.
3. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ठ अभ्यासाने मनाला वश करता येते.
4. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार
5. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.
6. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही.
7. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल.
8. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेत खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म
9. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते.
10. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही.
भगवत गीता विचार मराठी | Bhagavad Gita Thoughts In Marathi
हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले . भगवत गीता जरी संस्कृत भाषेत आणि काव्य स्वरूपात असली तरी त्याचे मराठी भाषांतर झालेले असल्यामुळे भगवत गीता विचार मराठीतूनही , Bhagavad Gita Thoughts In Marathi
उपलब्ध आहेत.
1.इतिहास सांगतो की, भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की, मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल.
2. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते.
3. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे.
4. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.
5. अती आनंदी असताना आणि अती दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत.
6. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही.
7. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे.
8. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील.
9. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो.
10. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात.
आनंदावरील गीता उपदेश मराठी | Bhagavad Gita Quotes In Marathi On Happiness
कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो. आनंदाच्या शोधात त्याचा संपूर्ण जन्म वाया जातो पण त्याला हवा असलेला खरा आनंद मिळत नाही. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटलेय गीतेत? जाणून घेऊया...आनंदावरील गीता उपदेश मराठी | Bhagavad Gita Quotes In Marathi On Happiness
1. जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते.
2. इंद्रिये आणि जाणिवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो.
3. तुझं, माझं, छोटं, मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात.
4. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे.
5. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका.
6. माणसाचे ह्रदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाझरू लागते.
7. कृष्णासाठी राधेने प्रेम पत्र लिहीलं, पूर्ण पत्रात फक्त कृष्णाचं नाव लिहीलं
8.जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता.
9. जीवनात शांती हवी असेल तर नेहमी सतुंलित जीवन जगा
10. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता, अंहकाराशिवाय काम करतात.
आर्य चाणक्य नीती आणि कोट्स (Chanakya Quotes In Marathi)
भगवत गीता श्लोक मराठी | Bhagvad Gita Shlok In Marathi
श्रीकृष्ण फक्त कृतीची प्रेरणा देतात. त्यांच्या मुखातून निघालेल्या गीतेतील अनेक श्लोक जीवनाच्या तत्त्वज्ञानाची अनुभूती देतात. भगवत गीतेतील श्लोकामधून जे सार सांगितेलेले आहे ते समजून त्याप्रमाणे आचरण केल्यास मानवी जीवन नक्कीच सुख, समाधानाचे असू शकते. यासाठीच जाणून घ्या भगवत गीता श्लोक मराठी | Bhagvad Gita Shlok In Marathi
1.परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
भावार्थ :- सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दृष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्म स्थापनेसाठी युगोनयुगे मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे.
2. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
भावार्थ :- तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे.
3. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
भावार्थ :- हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचे पतन झाले आणि अधर्म वाढला, तेव्हा तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी मी स्वतः अवतार घेतला.
4. नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत ॥
भावार्थ :- आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही.
5. ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥
भावार्थ :- सतत विषयाचा विचार केल्यामुळे माणूस विषयाबाबत आसक्त होतो, ज्यातून त्याच्या मनात कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते, कामना पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात त्याबद्दल क्रोध निर्माण होतो.
6. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥
भावार्थ : असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.
7. न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥
भावार्थ : निःसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे.
8. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते॥
भावार्थ : मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र, मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्या विषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो
9. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥
भावार्थ : जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरुपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही
भगवद् गीता यशावरील सुविचार | Bhagavad Gita Marathi Quotes On Success
भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. भगवत गीतेत सांगितेलेले सार संपूर्ण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी हितकारक आहे. जर तुम्हाला जीवनात यश हवे असेल तर त्यासाठी भगवद् गीता यशावरील सुविचार | Bhagavad Gita Marathi Quotes On Success
जरूर वाचा.
1. तुम्ही लक्ष्यापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्ष्यच कमजोर असते अथवा स्पष्ट नसते.
2. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्म नियंत्रण
3. रिकाम्या हाताने आला होतात रिकाम्या हातानेच या जगातून जाल, हातात असेल फक्त तुमचे कर्म
4. एखादी भेट तेव्हाच शुद्ध असते, तेव्हा ती शुद्ध मनाने, चांगल्या व्यक्तीला, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते.
5. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाखमोलाचे आहे
6. कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते.
7. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते.
8. जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमीच चांगले.
9. एखादी ज्ञानी हुशार व्यक्तीपण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही.
10. जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही.
भगवद् गीता सुविचार विद्यार्थ्यांसाठी | Bhagavad Gita Quotes In Marathi For Students
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरूवातीला शिष्य अर्जुनाला गुरू रूपात उपदेश केलेला होता. गुरू शिष्याचा हा संवाद म्हणजेच भगवत गीता ग्रंथ. या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. म्हणूनच विद्यार्थी दशेतील प्रत्येक शिष्याने या ग्रंथाचे पारायण/वाचन केले तर त्याचे जीवन नक्कीच सुख, समाधान आणि यशाचे असेल. यासाठी खाली दिलेले भगवद् गीता सुविचार विद्यार्थ्यांसाठी | Bhagavad Gita Quotes In Marathi For Students
1. फक्त मनच तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो.
2. कर्म न करताच फळाची अपेक्षा करणं हे मुर्खपणाचे लक्षण आहे.
3. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक करा.
4. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उदाहरण आहे
5. जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही, सगळीकडे बदल सुरू आहे, प्रत्येक गोष्ट वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते.
6. वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते.
7. जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थकवते.
8. प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलेल अथवा नाही, पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते.
9. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते.
10. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे.
0 Comments: