दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा - happy dasara wishes in marathi
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | 2021 Dasara Wishes In Marathi | Dussehra Wishes In Marathi | दसरा शुभेच्छा कोट्स मराठी | Dasara quotes in marathi | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा | Vijaya Dashami Wishes In Marathi
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | 2021 Dasara Wishes In Marathi :- दसरा म्हणजे तुमच्या चांगल्या सवयींचा तुमच्या आतल्या सर्व वाईट सवयींवर विजय. या दिवशी, आपण आपल्या वडिलांकडून आशीर्वाद घेतो आणि लहानांना आशीर्वाद देतो. त्याच वेळी, या पवित्र सणाच्या दिवशी, लोक एकमेकांना अभिनंदन करणारेHappy Dussehra Wishes In Marathi , दसरा शुभेच्छा संदेश पाठवतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला या लेखावर काही दसरा शुभेच्छा कोट्स मराठी , Dasara quotes in marathi ,दसऱ्याच्या शुभेच्छा , Dasara mishra in marathi , दशहरा शुभेच्छा , Happy Dussehra Messages In Marathi , दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा , Dasara Chya hardik shubhechha प्रदान करत आहोत, जे तुम्ही या सणात तुमचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करू शकता.
नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव संपल्यानंतर दी दहावा दिवस दसरा किंवा दशमी म्हणून
साजरा केला जातो . या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला.या संदर्भात एक पौराणिक कथा आहे ती अशी की, दसऱ्याच्या याच दिवशी महिषासूर या राक्षसाने थैमान घातले होते. त्याचा वध करण्याचे काम देवीने केले म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दसरा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो, जो यावर्षी 15 ऑक्टोबर 2021 रोजी आहे.नवरात्रीच्या या कालावधीत तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नसतील. तर दसऱ्याचे औचित्य साधत तुम्ही त्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवायलाच हव्यात.
दरवर्षी या दिवशी लोक त्यांच्या नातेवाईकांना भेटतात. त्याचबरोबर अनेक लोक या दिवशी होणारे रावण दहन पाहण्यासाठी देखील जातात. परंतु यावेळी कोरोना विषाणूमुळे लोकांना अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल आणि घरीच या सणाचा आनंद घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत, या भक्तिमय वातावरणात तुम्ही या दिवशी तुमचे कुटुंब आणि मित्रांचे अभिनंदन करू शकता.विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा , Vijaya Dashami Wishes In Marathi ,विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा कोट्स , Vijaya dashamichya hardik shubhechha , Vijaya Dashami Quotes In Marathi , Happy Dussehra Status In Marathi , दसरा स्टेटस मराठी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ( Dussehra Wishes In Marathi )
दसरा हा हिंदूंचा मुख्य सण आहे, हा सण भारतभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. अनेक श्रद्धा आणि परंपरा विजयादशमीच्या सणाशी संबंधित आहेत.
आपट्याची पाने झेंडुची फुले
घेऊनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी!
रम्य सकाळी, किरण सोनेरी
सजली दारी तोरमे ही साजिरी,
उलगगे आनंद मनी,जल्लोष हा
विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!
उत्सव आला विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
नवं,जुनं विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
तोरणं बांधून दारी
घालू रांगोळी अंगणी
करू उधळणार सोन्याची
जपुन नाती मना-मनाची
झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा!
देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वचेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसऱ्याच्या शुभेच्छा!
आयुष्याची वाट नवी ही रंगी बेरंगी भासे
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे
रडणे हरणे विसरून जा तू
त्येक क्षण कर तू हसरा
रोज रोजचा दिवस फुलेल
होईल सुंदर दसरा
दसरा शुभेच्छा कोट्स मराठी ( Dasara quotes in marathi )
या उत्सवासंदर्भात मुलांमध्ये विशेष उत्साह असून विविध ठिकाणी रामलीला महोत्सवाचे आयोजन केले
जाते.
मुहूर्त हसरा नव संकल्पांचा
सण दसरा हा उत्कर्षाचा..
चैतन्य संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी
उत्सव तो नव हर्षाचा…
कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं
काळ्या मातीमध्ये मिळतं.
दसऱ्याच्या शुभेच्छा!
झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
दारावर तोरण अंगणात रांगोळी
देवघरातील पाटावर सरस्वती
विराजलेली सोने लुटुनी साजरा करूया
हा दसरा लाभो सुख-समृद्धी शुभ दसरा
दारी झेंडूची फुले
हाती आपट्याची पाने
यावर्षी लुटुया सद् विचारांचे सोने
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ( Vijaya Dashami Wishes In Marathi )
दसरा म्हणजे - "असत्यावर सत्याचा विजय" आणि"अनीतीवर सत्याचा विजय". सत्याचा आणि धर्माचा विजय तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या आत लपलेल्या वाईट गोष्टींवर विजय मिळवणार आणि तेव्हाच हा सण साजरा करण्याचा मुख्य हेतू पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनात आनंद, आनंद आणि समृद्धी येऊ लागेल.
दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा!
तोरण बंधू दारी
घालू रांगोळी अंगणी
करू उधळण सोन्याची
नाती मनामनाची
लाखो लाखो किरणांनी उजळल्या
दाही दिशा घेऊन आलेल्या
नव्या आशा आकांक्षा
पूर्ण होवो तुमची सारी स्वप्न आणि
इच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री रामाचा आदर्श घेऊन
रावण रुपी अहंकाराचा
नाश करत दसरा साजरा
करूया दसऱ्याच्या सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा
पहाट झाली दिवस उजाडला
आला आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळ्या दाराचे तोरण
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं
वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे खास
असे जाळुनिया द्वेष मत्सराच्या
त्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे
विजयादशमी सणानिमित्त
आपणास आणि आपल्या
परिवारास मंगलमय शुभेच्छा
दसरा या दिवशी म्हणे सोने वाटतात
एवढा मी श्रीमंत नाही पण
नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मिळाली
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच
सदैव असेच राहा विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा
सीमा ओलांडून
आव्हानांच्या यशाचे प्रगतीचे
सोने लुटून सर्वांमध्ये हे वाटायचे
सदिच्छांची ही सोनेरी किरणे
पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण
अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहुर्ताचा हा दसरा
होवो आपणास लाभाचा
आपल्या जीवनात बरसो
पाऊस सुवर्णाचा
रम्य सकाळी किरणे
सोज्वळ आणि सोनेरी..
सजली दारी तोरणे ही सजली..
उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा..
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा..
दिवस सोनं लुटण्याचा
विसरून सारे जुने वाद
द्विगुणीत करू सणाचा आनंद आज
सोनेरी दिवस,सोनेरी पर्व
सोनेरी क्षण सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू मुहूर्त
आज दसऱ्याचा
आपट्याची पाने
अजून सोने बनवून
सोनेरी स्वप्नांचा प्रतीक होऊदे
आकाशी झेप घेण्याचे ध्येय तुझं
यशाच्या सीमा ओलांडून जाऊदे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
दिन आहे सोनियाचा
भासे धरा ही सोनेरी
फुलो जीवन आपले
येवो सोन्याची झळाळी
विजयादशमी निमित्त
हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ( Dasara Chya hardik shubhechha )
आपट्याची पानं
झेंडूच्या फुलांचा वास
आज आहे दिवस खूप खास
तुला सर्व सुख लाभो
या जगात प्रेमाने भेटूया
आपण या दसऱ्यात
झेंडूची फुलं दारावरील डुलं
भाताची रोपे शेतात डोलं
आपट्याची पानं म्हणतात सोनं
तांबडं फुटलं उगवला दिन
सोन्यानी सजला दसऱ्याचा दिन
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचं
लुटून सोनं प्रगतीचं
समृद्ध करा आयुष्य तुमचं
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूची फुले केशरी केशरी
वळणावळणाच तोरण दारी
गेरूचा रंग करडा तपकिरी
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृत कृत्याचा कलश रुपेरी
विजयादशमी ची रीत ही न्यारी
विजयादशमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
अज्ञानावर ज्ञानाने शत्रूवर पराक्रमाने
अंधारावर प्रकाशाने क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे
विजयादशमी
परक्यांना ही आपलसं
करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
सोन्यासारखे नाते माझे आणि तुमचे
हळुवार जपायचे दसऱ्याच्या
या मंगलदिनी अधिक दृढ करायचे
दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन
आज आहे दसरा प्रॉब्लेम सारे विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा ठेवा नेहमी हसरा आणि तुम्हाला
Advance मध्ये Happy Dasara
पुन्हा एक नवी पहाट
पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न नवे क्षितीज
सोबत माझी
एक नवी शुभेच्छा
हिंदू संस्कृती आपली हिंदुत्व आपली शान
सोने लुटुनी साजरा करू
वाढवू महाराष्ट्राची शान दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा
दसरा स्टेटस मराठी ( Happy Dussehra Status In Marathi )
क्रोधावर दयेचा , क्षमेचा विजय
अज्ञानावर ज्ञानाचा विजय
रावणावर श्रीरामाच्या विजयाचे
प्रतिक असलेल्या पावन
पर्व दसऱ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठले शिखर प्रगतीचे
यशाचे सोने लुटून सर्वांमध्ये
हे वाटायचे दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
नशीब आहे पराजयाचे
विजयाचे आंबा वेड आनंदाचे
रोवी ती प्रेमाची मुहूर्तमेढ
आपट्याच्या पानांचा मान आज
देवतांना त्याचाच आहे साज
जाळू या सारा सुका कचरा
पावसाळ्याच्या पाण्याचा करू नीट निचरा
मराठी अस्मितेची मराठी शान
मराठी परंपरेचा मराठी मानं
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल
आयुष्यात तुमच्या सुख आणि
समृद्धी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ( Vijaya Dashami Wishes In Marathi )
निसर्गाचे दान आपट्याची पानं
त्याला मिळे सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो
सुख शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
शब्दांना सूर लाभता
शब्दांचेही गाणे होते!
विजयादशमीच्या परीस्पर्शाने
आपट्याचेही सोने होते!!
-सूर्यकांत डोळस
आज तारीख आहे पंधरा
चेहरा ठेवा हसरा
कारण आज आहे दसरा
दसरा तुम्हा सर्वांना हासरा
जावो ही देवा चरणी प्रार्थना
विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा
तुमचा चेहरा आहे हसरा उद्या सकाळी
खूप गडबड आहे म्हणून तुम्हाला
आताच म्हणतो शुभ दसरा
सदैव गुणगुणत राहिले की,
त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी
आपट्याचे सोने होते
आपट्याच्या सोन्यावरुन
एक गोष्ट आपल्याला कळते|
प्रयत्नात सातत्य असेल तर
संधी आपोआप मिळते
-सूर्यकांत डोळस, बीड
आला आला दसरा
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करू दसरा
दसऱ्याच्या सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा
नवे संकल्प शिरी धरू
सुरवात प्रयत्नांची आज करू
सोने देऊन सर्वांचा सन्मान करू
दसरा असा साजरा करू
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या मुहूर्तावर
आता करू सुरुवात नव्या मार्गाने
जीवन जगण्यास आनंदीआनंद
उपभोगण्यास जीवन कृतार्थ करण्यास
स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ( 2021 Dasara Wishes In Marathi )
दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन
दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा!
बाहेरच्या नाही तर
आतल्या रावणाला जाळा…
आणि मगच दसरा साजरा करा
आज आहे दसरा…
सोनं देणं आणि घेण्याचा…
सोन देताना मनात देण्याची
भावना ठेवा आणि
आनंदोत्सव साजरा करा.
सत्याचा विजय आणि असत्याची हार…
हाच संदेश देतो दसरा हा सण
राम बनून मर्यादा आणि मान राखा…
कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका
लाल जास्वंद, पिवळा तुरा,
सोनचाफा दरवळला,
दसरा आला, झेंडू हसला
आणि म्हणाला शुभ दसरा!
उत्सव आला आनंदाचा…
एकमेकांना आनंद देण्याचा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्य आजि दिन । झालें संतांचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी। दैन्य गेलें उठाउठी ॥२॥
झालें समाधान । पायीं विसावलें मन ॥३॥
तुका म्हणे आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥
आजि सोनियाचा दिवस।दृष्टीं देखिलें संतांस
जीवा सुख झालें । माझें माहेर भेटलें ॥२॥
अवघा निरसला शीण । देखतां संतचरण ।।३।।
आजि दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा ॥४॥
0 Comments: