बैलपोळा शुभेच्छा संदेश - Bail Pola Wishes In Marathi
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Bail Pola Wishes In Marathi | बैल पोळा कोट्स मराठी | Bail Pola Quotes in Marathi | बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha
श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकुण सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा बैलपोळा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. तर मित्रानो आज तुमच्या साठी खास बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा , Bail Pola Wishes In Marathi , बैल पोळा कोट्स मराठी , Bail Pola Quotes in Marathi , बैल पोळा सणाच्या शुभेच्छा , Bail pola chya Hardik Shubhechha घेऊन आलेलो आहे.
शहरांची धावपळ पाहिली की पोळा या सणाची यांना काही माहिती आहे की नाही असे वाटते. परंतु या शहराच्या आसपासची गावं आणि संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो.
श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने संपूर्ण सृष्टीने आधीच हिरवाईचा शालु नेसलेला असतो. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरलेला असतो ज्यामुळे मानवी मन देखील ताजं तवानं होऊन जाते.
श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला येणाऱ्या बैलपोळा या सणाने….
"आज आवतन घ्या उद्या जेवायला या!"
असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पुजा करतात.
बैलांना पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो. बैलाची कायम निगा राखणाऱ्या गडयाला नवे कपडे दिल्या जातात.
कोरोना महामारीमुळे यावर्षी पोळा सण नेहमीच्या उत्साहात साजरा करणे शक्य नाही पण पोळा सणाचा आनंद आणि उत्साह कायम ठेवून, आपण आपल्या मित्रमंडळी आणि परिवाराला या मराठमोळ्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता चला तर बघूया:- बैल पोळा सणाच्या शुभेच्छा, Bail Pola Wishes In Marathi , बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा , Bail pola chya Hardik Shubhechha , बैल पोळा कोट्स मराठी , Bail Pola Quotes in Marathi ,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Bail Pola Wishes In Marathi
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
Bail pola chya hardik shubhechha
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या
सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
भारताची कृषी संस्कृती चा
महापर्व बैल पोळाच्या
हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय
बैल पोळा कोट्स मराठी | Bail Pola Quotes in Marathi
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोळ्या,
खाऊ द्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मगदुल
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
Bail pola chya hardik shubhechha
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बैलांना रंग देऊन व फुगे किंवा रंगिबेरंगि झुल वगैरे घालून सजवले जाते स्त्रिया बैलांचि पूजा करतात. तसेच मातीची छोटी बैले घेऊन कुंभार घरो घरी वाटतो
झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
Bail pola chya hardik shubhechha
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा
Bail pola chya hardik shubhechha
भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
म्हणजे आमचा लाडका बैल,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या
प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा!
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!
कष्टाशिवाय मातीला
आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
बैलांचा पोळा हा सण आला,
Bail pola chya hardik shubhechha
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू...
Bail pola chya hardik shubhechha
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha
आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!
जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा !
आज पुंज रे बैलाले फेडा उपकारांचे देेणे,
बैला, खरा तुझा सण शेतकऱ्यांचा,
Bail pola chya hardik shubhechha
डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा!
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
Bail pola chya hardik shubhechha
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा आज त्याच्या दैवताची
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी...
तिला स्वतःच्या हाताने चिखलाची
(काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा
सरंजाम करून खेळ मांडला जायचा...
सोबत गोड चकली असायचीच..
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस...
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण.
आपल्या शेतकऱ्यांचा सण.
आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणार्या बैलाचा सण.
Bail pola chya hardik shubhechha
पोळा सणावरच्या मराठी कविता
अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला...
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार... ( बहिणाबाई चौधरी)
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार.............सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर, ओढायाचे. (सण एक दिन : कवी यशवंत)
मित्रानो तुमच्याकडे जर “बैलपोळा शुभेच्छा संदेश 2021" bail pola wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bail pola wishes in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि happy bail pola message in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपणbail pola marathi quotes या लेखाचा वापर बैल पोळा एसएमएस , Bail Pola Festival Marathi SMS , बैल पोळा स्टेटस , Bail Pola Status In Marathi, Bail Pola Marathi Wishes Images , बैल पोळा मराठी शुभकामना इमेजेस असा देखील करू शकता.
0 Comments: