जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश - Janmashtami Wishes In Marathi
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | दहीहंडी शुभेच्छा | Dahi Handi Wishes In Marathi | Janmashatamichya hardik shubhechha
Gokulashtami / Janmashtami wishes :- आज (26 ऑगस्ट ) संपूर्ण देशभरात जन्माष्टमी आणि गोपाळकाला साजरा केला जात आहे. या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.असे मानलं जातं की कृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला.जन्माष्टमीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी आपण हे खास जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा , Janmashtami Wishes In Marathi ,कृष्ण जन्माष्टमी कोट्स , Krishna Janmashtami Quotes In Marathi , दहीहंडी कोट्स , Dahi Handi Quotes In Marathi , दहीहंडी शुभेच्छा , Dahi Handi Wishes In Marathi , गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Gokulashtami Quotes in marathi संदेश (Gokulashtami / Janmashtami wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छांचे मेसेज शेअर केले जात आहे.या निमित्ताने तुम्हालाही शुभेच्छा पाठवायच्या असतील तर तुम्ही येथील मेसेजेस वापरू शकता.
जन्माष्टमीच्या शुभेच्छा : शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पापाचे ओझे वाढेल, तेव्हा भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर नवीन अवतारात येतील आणि पाप्यांचा नाश करतील. द्वापरयुगात जेव्हा पृथ्वीवर जुलूम करणाऱ्यांचे ओझे वाढले, तेव्हा भगवान विविष्णूंनी श्री कृष्णाचा अवतार घेतला आणि कंसासारख्या दुष्टांचा वध केला आणि महाभारताच्या युद्धात गीतेचा उपदेश केला.
दहीहंडी शुभेच्छा :-भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे.कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला। गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.
यावर्षी कोरोना महामारीमुळे जन्माष्टमी आणि दहिहंडी चा उत्सव अगदि छोट्या स्तरावर साजरा केला जाणार आहे. तरी दरवर्षी चा तोच उत्साह कायम ठेवून आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांना हॅपी जन्माष्टमी स्टेटस , Happy Janmashtami Status In Marathi , कृष्ण जन्माष्टमी मेसेज , Krishna Janmashtami Message In Marathi , जन्माष्टमी मराठी एसएमएस , Happy Janmashtami Marathi Sms शुभेच्छा देऊ शकाल
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi |
चंदनाचा सुगंध, फुलांचा हार
पावसाचा सुगंध राधा आणि
कृष्ण यांच्या प्रेमाची आली बहार
कृष्ण जन्माष्टमी निमित्त
शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
राधे ची भक्ती , बासरी ची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करून
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
रूप मोठं प्रेमळ आहे चेहरा मोठा निराळा आहे
सर्वात मोठ्या समस्येला
कृष्णाने क्षणात पार करून टाकले
गोष्ट द्वापार युगाची दुष्टांच्या संहाराची
अहंकारी राजा अन त्याच्या हो विनाशाची
नाश कराया अवतरला कृष्ण देवकीच्या उरी
कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला…
तुझ्या नावाचं कृष्ण रसायन
माझ्या रोमारोमात अभिनंदन
ध्यास लागुनी तुझा आयुष्य
श्रीकृष्ण फिरंग होऊन जावं
कृष्ण दिवा राधा वाती
भाव एकच निखळ प्रीती
जडलेली प्रीत अनामिक ओढ जीवाची
जुळलेली नाती जन्मांतरीची
Krishna Janmashtami Quotes In Marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
वसुदेव देवकीचा कान्हा आला
यशोदेचा नंदलाला आला
पार्थचा सारथी तो आला
सुदाम्याचा जिवलग हा आला
दिन आला मोठा आज
कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला,
जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
वाट पाहता पाहता ही जिंदगी माझी संपली
कधी हसण्यात तर कधी रडण्यात रात्र जाळली
कृष्णापरी तू न मी रे सारखी प्रित माझे जाणली
कृष्ण जन्माष्टमी च्या आणि दही हंडीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी,
गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना,
पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
आला का नाही स्वप्नात माझ्या
आणि मधुर बासरी वाजवू लागला
स्वप्नातच त्याच्या बासरीचा
नाद मला लागला
कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
कणाकणात वास ज्याचा
प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका जो
माझ्या डोळ्याचा तारा तो
माझा नंद गोपाळा
नंद के घर आनंद ही आनंद भयो
नंद के घर गोपाल आयो जय हो
मुरलीधर गोपाल की जय हो कन्हैया लाल की
Janmashtami Wishes In Marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग सावळा ग ज्याचा प्रेमळ ग तो सखा,
आला आला माझा कृष्ण कन्हैय्या आला
नभी गरजती , मेघ बरसती
हो श्रावण धारा अष्टमीच्या
रात्रीला मोहन अवतरला भूवरा
अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम
रामनारायण वासुदेव राधे कृष्ण
राधे कृष्ण राधे राधे कृष्णा कृष्णा
आज पुन्हा जन्माष्टमी आली
लोण्याच्या भांड्याने पुन्हा
एक गोडवा घेऊन आली
कान्हाची आहे किमया न्यारी
दे सर्वांना आशीर्वाद भारी
कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार…
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी आमची
ही शुभकामना की श्रीकृष्णाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व
कृष्ण भक्तांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा
नंदकिशोरा चित्त
चकोरा गोकुळ कान्हा
मनमोहन तू
राधेचे प्रेम मुरलीचा गोडपणा
लोणी ची चव आणि गोपिका
या सर्वांनी जन्माष्टमी विशेष बनवली आहे
हीच श्री कृष्ण जोड प्रार्थना असेच
प्रेम आणि गोडवा नात्यांमध्ये राहू दे
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi
हृदय वृंदावन पाळण्या माजी
निजरे कृष्ण जो जो जो जो रे
श्रीहरी उन्मनी निद्रा करी
जो जो रे जो जो रे
कृष्णाची भक्ती मनी त्याची शक्ती...
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग
मात्र अति उत्साहात करू नका विनयभंग
कृष्ण ज्यांचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतशत प्रणाम
प्रेम राधेच वेड होत
म्हणुन तर कृष्णा आधी
राधेच नाव येत
प्रेमाला नात नाही सुंदर मन लागतं..
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा
गोकुळ मध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत जाने रचला रास
यशोदा देवकी ज्याची मैया तो सार
यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैया
रंग निळा मोर पंख
अधरी बासरी साद ए कुणी
होई राधा बावरी
गोकुळ ही फुलते त्याचे रूप पाहुनी
कृष्ण श्वास कृष्ण आस कृष्ण अंतरी
कृष्णाच्या भक्तीत विसरा
सर्व दुःख सर्व मिळून कृष्णभक्तीत
मिळून सारे हरी गुन गाऊ एकत्र
देवकीचा खट्याळ कान्हा
खोड्या काढुनी पसार प्रसार होई
पकडा वया त्या चोरट्याला
यशोदा बिचारी दमुनीया जाई
दहीहंडी शुभेच्छा | Dahi Handi Wishes In Marathi
लोणी चोरण्याची कला अद्वितीय आहे,
मुकुटवरील मयूर पंख अनन्य आहे.
माझ्या मुला, गोपाला, तू सर्वांना प्रिय आहेस.
लय झाली दुनियादारी
खूप बघितली लय भारी
आता फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीची तयारी
एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!
भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया
दहीहंडीच्या शुभेच्छा!
दह्यात साखर साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर जोशात साजरा
करू आज गोकुळाष्टमी चा सण
दह्याची हंडी पाण्याची पवार
लोणी चोरायला आले कृष्णराज
जय श्री कृष्ण म्हणून
करुया दिवसाची सुरुवात,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
मित्रांनो थराला या
नाहीतर धरायला या
आपला समजून, गोविंदाला या
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
काय होते प्रेम हे जगाला सांगितले
ज्याने हृदयाला प्रेमाने सजविले
त्याच श्रीकृष्णाचा जन्मदिवस
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी
च्या हार्दिक शुभेच्छा
दहीहंडी शुभेच्छा | Dahi Handi Quotes In Marathi
दहीकाल्याचा उत्सव मोठा
नाही आनंदाला तोटा,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना,
पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा
दही, लोणी ज्याची आवड…
आज आहे त्याचा जनमदिवस…
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
कृष्णा जगती । आकर्षित करे
पाहूनी त्याला रे । चित्त हरे
श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर
आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम
राहू जन्माष्टमीच्या निमित्ताने
आपण सर्वांनी त्यांना वंदन करूया
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
गोविंदा आला रे आला
जरा मटकी संभाल ब्रिजबाला
पोर थोडी जिद्दी आहेत.
अर्ध्यावर डाव सोडणार नाय
या वर्षी नाय पण पुढल्या वर्षी
दहीहंडी गाजवल्या शिवाय राहणार नाही
प्रशासनाला सहकार्य करु...
कोरोनाला हद्दपार करुया..!
बाळ गोपाळांनो यंदाचा उत्साह
कमी नका होऊ देऊ
हंडी नाही तर काय झालं
यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊ
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi |
यंदा घरुनच करु श्रीकृष्णाला
नमस्कार दहीहंडीच्या शुभेच्छा
ऑनलाईन देउन करु गर्दीला नकार !
दहीहंडीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
वर्षातला हा एकच दिवस जेव्हा
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी
माणसाला वर जायला
प्रमाणिक पणे मदत करतो..
गोपाळकाला व दहीहंडीच्या हर्दिक शुभेच्छा....
दहीहंडी आली.. यंदा सण नसला तरी
ती भावना मनात रहायला हवी!
जो अडचणीत असेल त्याला
पाठबळाची शिडी द्या,
ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत
त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या,
एखादा आत्मविश्वासाचा मनोरा
कोसळत असेल तर झेलायला आपले
सामर्थ्यवान हात वर असुद्या..
शेवटी एकजुटीचा गोविंदा मनात
जिवंत रहायला हवा!
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि
दहीहंडीचा सर्वांना शुभेच्छा
आनंदाचा घेऊन गोपाळकाला
आला रे आला गोविंदा आला...
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा....
सण परंपरेचा.... सण बाळगोपाळांचा...
सण अखंड महाराष्ट्राचा...गोपाळकाला
दहिहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
कृष्णाच्या भक्तीत होउन
जाऊ दंग मात्र अतिउत्साहात करु
नका नियमभंग
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !
श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे.
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi |
बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या
ताई अक्का वाकू नका
पुढे वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
एक-दोन-तीन-चार
हमाल पुण्यातली पोरं हुशार
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्या बाळा
आला रे आला गोविन्दा आला
गवळ्याच्या पोरीनो जरा मटकी सांभाळा
टेन्शन नही लेता ये बंदा
किती पण उंचावर बांधा
हे नाद करायचा नाही औन्दा
आला दहा थरांचा गोविंदा
तुझ्या घरात नाही पाणी
घागर रिकामी रे गोपाळा
एकच जल्लोष एकच जय
बोल बजरंग बली की जय
दो आहे माखन चोर
जो आहे मुरलीधर
तोच आहे आपल्या
सर्वांचा तारणहार
0 Comments: