बहिण दिनाच्या शुभेच्छा - Happy sisters day wishes in marathi
Sister day wishes in marathi | बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | sisters day quotes in marathi | बहिण दिनाच्या मराठी कोट्स | Happy sisters day wishes in marathi |Bahin Dinachya hardik Shubhechha |
मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही Sisters Day निमित्त Sister's day quotes(बहिण दिनाचे शुभेच्छा संदेश) सादर केले आहेत. बहीण हे नातं एक सुंदर आणि प्रेमळ नातं आहे. यात प्रेम आहे, रागही आहे, भांडणही आहे. परंतु हे सर्व असूनही, हे अतुट नाते आहे, जे हृदयाच्या जवळ आहे आणि खूप प्रिय आहे.बहीण हे आपल्याला देवानं दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असत, आपले सर्व सिक्रेट जिच्याकडे असतात, जी आपली आईसारखी काळजी घेते, चुकलं तर रागवते, प्रेमानं समजून सांगते, ती एक बहिनच असते, प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच, त्याच बहिणीवर आजच्या लेखात काही Sister day wishes in marathi | बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | sisters day quotes in marathi | बहिण दिनाच्या मराठी कोट्स | Happy sisters day wishes in marathi , Bahin Dinachya hardik Shubhechha , Tai Dinachya hardik Shubhechha
पाहणार आहोत.
जगात भावंडाचं नातं हे सर्वात वेगळं आणि अनोखं असतं.. मग ते बहिणी बहिणींचं असो किंवा बहीणभावाचं असो. प्रत्येकालाच आपली बहीण प्रिय आणि लाडकी असते. आपण तिच्याशी जितकं भांडतो तितकाच तिच्यावर प्रेमाने हक्कही गाजवतो. कधी कधी ती रुसल्यावर तिची समजूत काढण्यात एक वेगळीच मज्जा असते. आईबाबांकडे तुमचं नाव सांगायला ती जितकी तत्पर असते तितकीच त्यांचा मार आणि ओरडा मिळू नये म्हणून तुमची काळजीही घेते. आईप्रमाणे जीवापाड प्रेमही करते आणि वडीलांप्रमाणे आधार देते अशा तुमच्या लाडक्या बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणाऱ्या या Sister day 2021wishes in marathi | बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | sisters day 2021 quotes in marathi | बहिण दिनाच्या मराठी कोट्स |Sisters day whatsapp status in marathi | Happy sisters day 2021 wishes in marathi , बेस्ट शायरी बहीण कोट्स, बहिण दिवस स्टेटस, Sister's day quotes in marathi ,Happy Sisters day wishes in marathi ,मला आशा आहे की तुम्हाला बहिणीवरील हे विचार खूप आवडतील आणि तुम्ही ते सोशल मीडियावरही शेअर कराल.
Sister day wishes in marathi | बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मनात ठेवण्या एवजी मन मोकळे
करण्याची एक हक्काची जागा
म्हणजे बहिण
कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता
प्रत्येक गोष्ट समजते
पवित्र नाते हे बहिण भावाचे
लखलखतं राहू दे बंध
जिव्हाळ्याचे
ताई हे नुसतं नाव नाही
त्याच्या आयुष्याच गाव आहे
आई नंतर तिच्यामुळे त्याच्या
आयुष्याला भाव आहे
ताई शब्दातचं आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मी मज राहो
साथ माझ्या ह्या ताईची
रेशमी धागा मनगटावरी
बांधते बहिण भावा
राहावे सुखी तुम्ही
हिच मागणी देवा
बहिण ही फक्त बहिण नसते
तर ती तुमची
सुख दुःखाची साथीदार असते
माझी बहिण माझ्यासाठी
माझ्या काळजाचा तुकडा आहे
I Love You Sister
ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी
लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
मी खरच लकी आहे कारण
मला तुझ्या सारखी बहिण मिळाली
तुझ्यासारखी बहिण मिळाल्याबद्दल
मी खरच भाग्यवान आहे
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुला आनंद आणि दिर्घायुष्याची
प्राप्ती झाली
ताई तू माझ्या साठी प्ररणेचा स्त्रोत आहेस
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस
Sister day wishes in marathi | बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रामुळे असतात चांदण्या मस्त
चांदण्यांमुळे असते रात्र मस्त
रात्री वरून असते Life मस्त
आणि या जगात माझी बहिण
सर्वात जबरदस्त….
बहिण भावाच नातं हे असचं असत
ज्याला वयाच बंधन नसतं
कितीही भांडले तरी अडचणीत
एकमेकांसाठी धावून येतातचं….
आपल्या बहिणी सारखी दूसरी
मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात, ती ज्यांना
बहिण असते
हाती बांधायला राखी ,
अहो बहिण हवी एक
बहिणीच्या नात्यासाठी
प्रत्येक घरात
वाचायला हवी लेक
Happy sisters day wishes in marathi |Bahin Dinachya hardik Shubhechha
नातं बहिण भावाचं
म्हणजे Tom And Jerry
तेवढाच राग आणि तेवढंच प्रेम
हे म्हणजे लय भारी
तुला नकळत समजून काय समजायचं
तुझ्यासारखी बहिण दिली म्हणून
देवाला हात का नाही जोडायचे…
तू प्रत्येकाला भेटू दे असे का म्हणायचं..
तू माझ्या जवळ आहे मग तुला मीच जपायचं…
कारण मला आयुष्यात प्रत्येक क्षणाला
तुझ्या सोबत राहायचं….
माझी बहिण मलाच हवी
पुढच्या सात जन्मात तीच हवी
आवडतं मला तीला त्रास देणं
तिच्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं
तिला त्रास देण्यात अलगच मजा असते
ते सुख दूसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते
आयुष्यात बहिण असणं खूप
Important असतं कारण आयुष्यातली
प्रत्येक गोष्ट तिला Share करु शकता
मग ती रक्ताची असो का मानलेली
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला
आपल्या पासून कितीही दूर
असली तरी फक्त
बहिणचं असते जीची
आपल्यावरची माया
कधीच कमी होत नाही
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्व काही नसतो
मला माझ्या आनंदाहूनहि प्रिय आहे
माझी बहिण…
मित्र आपल्याला हसवतील
आपल्यावर प्रेम करतील परंतु
बहिण ही अशीव्यक्ती आहे
जी नेहमीच आपल्या पाठिशी
राहून आपले अश्नू पुसते
बहिण भावचं नातं हे
जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही आणि
नसलं तर जेवण जात नाही
येता जाता बहिणीच्या डोक्यावर
टपली मारणे यासारखं
सुख तुम्हाला जगात शोधून
सापडणार नाही
बहिण मोठी असो की छोटी
तिला नेहमीच आपल्या
भावाची काळजी असते…
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव
टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहिण असते
बहिण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | sisters day quotes in marathi
माझी बहिण लाडाची जणू
वटवृक्षाची सावली
माया ममतेनं भरलेली ती माझी
मेवा आणि मिठाई
सासरी जातांना मिठी मारुन रडणारी
नाही आता ओरडणार रडत रडत म्हणणारी
प्रत्यकाच्या आयुष्यात अशी
एक तरी बहिण असावी जीवापाड
जपणारी आणि खूप प्रेम करणारी
बहिण आपल्या आईसारखीच
प्रेमळ आपल्या आयुष्यातील
सगळ्यात जवळची मैत्रीण जिला
आपल्या आवडी निवडी माहिती
आपली काळजी घेण्यात
कधीच कमी ठरत नाही
माझी सगळी बडबड ऐकून घेणारी
एक मैत्रीण हवी होती
वेळ पडली तर गोष्टी समजावून
सांगणारी हवी होती
लहान असो वा मोठी मला
बहिण हवी होती
Lifeline Sister
मोकळेपणाने आपण
जीच्यामुळे बोलू शकतो
रागवू शकतो आणि
आपले मन हलके करु शकतो
ती म्हणजे बहिण
तोंडावर भांडत असलो ना
तरी मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेले
ताई हे दूसरं रुप आहे
जगातील सर्व बहिणींमध्ये तू सर्वात
चांगली ताई आहेस आणि
मी भाग्यवान आहे की तू माझी
ताई आहेस…
बहिण दिवस स्टेटस | Sisters day whatsapp status in marathi
तू पाठिशी असताना
आभाळ देखील ठेंगण वाटतं
तुझ्या केवळ असण्याने
मला आनंदाचं भरतं येतं
बहिणीच्या चेहऱ्यावरील
गोड स्माईल
हिच आमची शुभ सकाळ
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्या सारखा कोणी नाही
बहिण भावाचे नाते हे हृदयाशी
जोडलेले असते त्यामुळे
अंतर आणि वेळ त्यांना
कधीच वेगळे करु शकत नाही
माझ्या प्रत्येक वेदनेवर मलम आहेस तू
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं
कारण आहेस तू,काय सांगू ताई
माझ्यासाठी कोण आहेस तू
बहिण म्हणजे आईचं रुप
बहिण म्हणजे प्रेम
बहिण म्हणजे आनंद
बहिण म्हणजे विश्वास
बहिण म्हणजे सुख दुःखाची साथीदार
बहिण म्हणजे भावंडांसाठी वेडी असणारी
आई म्हणते तिचं हृदय आहेस तू
बाबा म्हणतात त्यांचा श्वास आहेस तू
माझं तर सगळं जीवनच आहेस तू…
माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक
असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी
आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये
कारण तू आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला
माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य
असो तुला कोणाची नजर ना लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुझे
" तू केवळ माझी बहीणच नाहीस तर
माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळातील
माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस. माझ्या सर्वोत्तम
मैत्रीतील बहिणीला खूप खूप शुभेच्छा. "
सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मनुष्याच्या
रूपात एक परी असते आणि माझ्या
आयुष्यातील ती परी तू आहेस.
हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी
खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे
तुझ्यासारखी बहिण आहे
मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की
तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही
जागा न मिळो
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण….
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ
असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला खूप शुभेच्छा.
मी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी बहिण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम
करणारी….माझी प्रिय ताई
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही शेवटी
तुला जे हवे आहे ते मी देईन, कारण तू माझे हृदय आहेस.
0 Comments: