जागतिक नेत्रदान दिन -World Eye Donation Day Slogans in Marathi
World eye donation day quotes in marathi | नेत्रदान मराठी घोषवाक्य | World Eye Donation Day Slogans in Marathi
एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे सर्व भाग महत्वाचे असतात, परंतु डोळ्यांना यामध्ये थोडे अधिक महत्त्व असते. डोळे ही देवाची देणगी आहे. ज्याचे डोळे नसतात त्यांच्याकडूनच त्याचे मूल्य चांगले समजू शकते. मृत्यूनंतर डोळ्यांनी दान देऊन आपण कोणालाही नवीन जीवन देऊ शकता.
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस जगभर अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून नेत्रदानाची जनजागृती केली जात
उद्देश्य:
जागतिक नेत्रदान दिनाचे उद्दिष्ट नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर डोळे दान प्रवृत्त करणे आहे.अंधत्व ही विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार(WHO) कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वाच्या मुख्य कारणांपैकी आहे.
मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे,कारण डोळे असले तर कोणतेही काम मणुष्य सहज करु शकतो, त्यामुळे 'दृष्टी आड सृष्टी' किंवा 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' ह्या म्हणी प्रचलित झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या नेत्रचक्षुद्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे मानवाच्या पंचेद्रिय मध्ये डोळ्यांना मानाचे स्थान आहे. डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य आस्वाद घेण्या बरोबर त्यांची छबी सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते.
दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान , डोळेदान किंवा दृष्टीदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास निश्चितच होवू शकेल. अर्थात व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस निश्चित होईल.
मानवी जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधाना मदत करू शकतात. तेव्हा दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करून त्याला Normal life जगण्यास मदत करु शकतो.त्यासाठी World eye donation day quotes in marathi, जागतिक नेत्रदान दिन मराठी कोट्स , जागतिक नेत्रदान दिवस घोषवाक्य ,Jagtik Netradan Din slogan , जागतिक नेत्रदान दिन 2023 घोषवाक्य , World Eye Donation Day 2023 Quotes in Marathi , World Eye Donation Day 2023 Slogans in Marathi
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये शक्यतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या आत करण्यात येते .नेत्रदानाचा निर्णय घेतलेल्या एका मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येतात. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या नजीकच्या नेत्रदान हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकता.
नेत्रदान ही संकल्पना राबविण्यासाठीचा दिवस म्हणजे जागतिक दृष्टीदान दिवस होय. प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केल्यास मोठ्या प्रमाणात जगातील नेत्रहिन व्यक्तीचे दृष्टीला प्रकाशमान करु शकतील.आजच्या काळात नेत्रदान संकल्पाचा विचार आणि आचार सामान्य माणसाच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.
डोळ्यांमुळे माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव, स्वभाव प्रत्येक व्यक्ती सहज ओळखू शकतो. त्यामुळेच विविध भाषांमध्ये डोळ्यांच्या विशेषणांची गाणी झाली आहेत उदा.'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे ', 'डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नको' इ. 'डोळे' माणसाला सौंदर्याबरोबरच अनेक गोष्टी शिकवतात. डोळे इतर अवयवांपेक्षा अधिक माहिती माणसाला देतात जसे की चेहरेपट्टी वरून ओळखला जाणारा व्यक्तीचा स्वभाव, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी त्यातून घेतला जाणारा बोध,त्यामुळे ‘दृष्टीदाना' चे महत्व चटकन माणसाला जाणवते. 'दृष्टीहीन' या सर्व गोष्टींना मुकतो,त्याच्या जीवनातील अंधार दूर होण्यासाठी किमान प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान संकल्प करावा. म्हणूनच या लेखात आम्ही नेत्रदान वर मराठी घोषवाक्य , Slogans On Eye Donation In Marathi , नेत्रदान घोषवाक्य मराठी , Eye Donation Slogans in Marathi , नेत्रदान घोषवाक्य स्लोगन मराठी , नेत्रदानावर मराठी घोषवाक्य , जागतिक नेत्रदान दिन घोषवाक्य ,
नेत्रदान मराठी घोषवाक्य | World Eye Donation Day Slogans in Marathi | नेत्रदानावर मराठी घोषवाक्य
एकाच्या नेत्रदानातून
सहा जणांना मिळते दृष्टी
नेत्रदान हेच , सर्वश्नेष्ठ दान
जीवनाचे अमूल्य वरदान,
नेत्रहिनाला नेत्रदान
दृष्टी जी निरंतर आणि चिरंतर राही
जागतिक दृष्टिदान दिवस
मृतक देह,
काही नाही हरवती,
नेत्रदानाने,
मिळे नवीन ज्योती
दृष्टिदान सकल्प करूया...
दृष्टिदानाने गरजूंचे आयुष्य उजळूया…
एखाद्यास आपल्या
डोळ्याद्वारे
सौंदर्य पाहू द्या
डोळे आत्म्याची खिडकी आहे
कृपया दान करा
नेत्रदान हे दान मोठे
करून साठवा पुण्याचे साठे
डोळ्यांना मरण नाही
डोळे दान करा
दृष्टीदानाचे पवित्र कार्य करुन
आपल्या जीवनाला सार्थक बनवा !
World eye donation day quotes in marathi | जागतिक नेत्रदान दिन मराठी कोट्स
डोळे मौल्यवान आहेत,
नेहमी आपल्या डोळयांची काळजी घ्या
नेत्रदानाचा संकल्प करा.....
मृत्यु नंतर मृत्युंजय बना..
जाण्याआधी कुणाला द्या जीवनदान
अमर रहायचं असेल तर करा नेत्रदान
नेत्रदान सर्वश्नेष्ठ दान
करा नेत्रदान मिळवा मान
तुमच्या नंतरही तुमचे अस्तित्व असावे
म्हणूनच तर नेत्रदान करावे
मृतक देह काही नाही हरवती
नेत्रदानाने मिळे नवी ज्योती
नेत्रदान करा….अन्
हे सुंदर जग पुन्हा पहा…!!
नेत्रदानाचा संकल्प करा
मृत्यू नंतर
मृत्युंजय बना
अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं
तुमच्या डोळ्यांतूनही कोणीतरी जग बघावं
जागतिक नेत्रदान दिवस घोषवाक्य |Eye Donation Day Slogans in Marathi | जागतिक नेत्रदान दिन 2023 घोषवाक्य
नेत्रदान करून कोणाचा
तरी जग उजाळा ||
जिवंतपणी रक्तदान
जाता-जाता जाता अवयव दान
आणि मृत्यूनंतर नेत्रदान
जग किती सुंदर आहे
याचा अनुभव
आपल्यानंतर दूसऱ्यालाही मिळवा
यासाठी नेत्रदान करा
डोळ्यात विश्वास आहे
कृपया दान करा
नेत्रदान करा
मानवतेच्या हिताचे
काम करा
पुण्य कर्माचा रस्ता
फक्त एक प्रयत्न
करून तर पहा
नेत्रदान करा
जागतिक नेत्रदान दिन 2021 घोषवाक्य | World Eye Donation Day 2021 Quotes in Marathi | World Eye Donation Day 2023 Slogans in Marathi
अंधारातून….प्रकाशाकडे
हा बदल आपण घडवू शकतो
नेत्रदान करू शकतो
नेत्रदान करा आणि
जगाचे पुन्हा निरीक्षण करा
आपले डोळे
आमचे जीवन
नेत्रदान एक सर्वश्नेष्ठ दान
एक सामाजिक चळवळ
जीवनाचे अमुल्य वरदान
दृष्टी हिनाला करा दृष्टीदान
निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात आहे
नेत्रदान करा
नेत्रदान मराठी घोषवाक्य | World Eye Donation Day Slogans in Marathi | नेत्रदानावर मराठी घोषवाक्य
जगता जगता रक्तदान,
जाता जाता अवयवदान,
आणि गेल्यानंतर नेत्रदान !!
डोळ्यांपेक्षा किमती कोणतेही रत्न नाही
म्हणूनच त्याच्यापेक्षा मोठे दूसरे दान नाही
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त
नेत्रदान करण्याचा संकल्प करा
मरणोत्तर करा संकल्प
अनमोल डोळे दानाचा
कलियुगातील पुण्यदान
गरजूंना नेत्रदान
नेत्रदान करा आणि
जन्मोजन्मीच्या
पुण्याचा साठा करा
World eye donation day quotes in marathi | जागतिक नेत्रदान दिन मराठी कोट्स
आयुष्याच्या पल्याड जाऊनही
सदैव जिवंत रहावं..
अनंतात विलीन होऊनही
आपल्या डोळ्यांनी अपल्यांना
मन भरून पाहावं..
मरते ते शरीर, अमर आहे आत्मा
नेत्रदानाने मिळेल स्वयं परमात्मा
शैब्य: श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ I
अलर्कश्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम II
निर्धार त्यांनाही
दृष्टी देण्याचा
अंधारात त्यांनाही
मार्ग दाखवण्याचा
मरणोत्तर नेत्रदानाचा
संकल्प करा
आपल्याला आपल्या नंतरही जग
पुन्हा बघता येते
नेत्रदानाचे इच्छापत्र लिहून दिल्यास
मृत्यूनंतर आपले डोळे गरजूस
दृष्टी देतील
अनंतात विलिन होऊन ही आपल्या
डोळ्यांनी आपल्यांना मन भरून पहावं
म्हणूनच नेत्रदान कराव
जागतिक नेत्रदान दिवस घोषवाक्य | Eye Donation Day Slogans in Marathi | जागतिक नेत्रदान दिन 2023 घोषवाक्य
गेल्यावर थोडे दिवस आठवण
म्हणून घरात लावलेल्या
दिव्यापेक्षा कोणाच्यातरी
डोळ्यातला कायमचा प्रकाश
होणं चांगले नाही का?
परतीच्या प्रवासात मुक्कामाला जाता-जाता
नेत्रदान करू या की
अनायासे जाता-जाता सत्कर्माचे पुण्य
पदरात पडून घेऊ या की
आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांनी
हे सुंदर विश्व पुन्हा पाहण्याची संधी
इतरांनाही मिळावी याच्या सारखा
दूसरा आनंद तो काय असणार !
नेत्रदान मराठी घोषवाक्य | World Eye Donation Day Slogans in Marathi | नेत्रदानावर मराठी घोषवाक्य
अनंताच्या पलीकडे जाऊनही
अस्तित्व आपलं सदैव उरावं
आपल्या नंतर सुध्दा आपल्या डोळ्यांनी
आपल्या लाडक्यांना कुणीतरी पहावं
जेव्हा डोळे माझ्यासाठी हे जग
पाहतील ,मी गेल्यानंतर माझे
आयुष्य अर्थपूर्ण होईल
आपण गेल्यानंतर देखील आपल्या डोळ्यांना
हे रंगीबेरंगी जग पाहता येईल,
ज्यांची स्वप्ने आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात
नवीन रंग आणतील
सिकंदर सुध्दा गेला मोकळ्या
हाताने जग सोडून
तुही काही घेऊन जाणार
नाहीस कोणाकडून
सोडून जा तुझ्यामागे अशी निशाणी
पिण्याआधी आंधळ्यालाही कळेल
विष का पाणी
नेत्रदान - सर्वश्नेष्ठ दान
दृष्टीदानाचे पवित्र कार्य करुन
आपल्या जीवनाला सार्थक बनवा
चला तर मग , निसर्गाची
अद्भूत किमया अंधानाही
पाहता यावी यासाठी
नेत्रदान करण्यासाठी
नेत्रदान मराठी घोषवाक्य | World Eye Donation Day Slogans in Marathi | नेत्रदानावर मराठी घोषवाक्य
अंतिम विश्रांती साठी
जेव्हा आपले डोळे बंद होतील,
तेव्हा त्याच डोळयांनी अंध व्यक्ती
हे सुंदर जग पाहू शकतील.
नेत्रांच्या या ज्योतीने
दिवे लागतील आनंदाने
अंधःकारमय या जगात
होईल उजेड अंधमय जगतात
काय करशील या डोळ्यांचे तुझ्या
जाण्यानंतर जमलेच तर दे कुणाला
जाण्यानंतर तुला काहीच नाही फायदा
का नाही करत ते देण्याचा वायदा
जागतिक नेत्रदान दिन 2023 घोषवाक्य | World Eye Donation Day 2023 Quotes in Marathi | World Eye Donation Day 2023 Slogans in Marathi
नेत्र म्हणजे नयन
हे दान म्हणजे सर्वश्नेष्ठ दान
याच्या दानाने होते पुण्यकर्म
आपल्या हातून घडते सत्कर्म
दृष्टीदानाचे पवित्र कार्य करून
आपल्या जीवनाला सार्थक बनवा
आपल्या नंतरही आपल्याला जग बघता येते..
नेत्रदानाचे इच्छापत्र लिहून दिल्यास
मृत्यूनंतर आपले डोळे गरजूस दृष्टी देतील.
0 Comments: