आंबेडकर जयंती शुभेच्छा - Ambedkar jayanti Quotes in Marathi.
Dr.Babasaheb Ambedkar whatsapp status, , Ambedkar Jayanti wishes and quotes in marathi
आंबेडकरांनी भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले. डॉ भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मघ्यप्रदेशातील इंदोर जवळ महू छावणी येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव भीमा सपकाळ असे होते. डॉ. भीमराव आंबेडकर जन्मजात अतिशय प्रतिभा संपन्न होते.1990 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न” देण्यात आला होता.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या भीमराव आंबेडकर यांनी समाजातील जातीभेद मिटवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे, आंबेडकरांचे जीवन अतिशय संघर्षपुर्ण होते.
बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे महान सुविचार खरोखर प्रेरणादायक आहेत. आंबेडकरांचे प्रेरणादायक सुविचार वाचन केल्यास एखादी व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना सहजपणे करू शकते.
बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आहेत, बाबासाहेबांचे भारत देशासाठी असलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. आजही बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे सुविचार त्यांचे आदर्श प्रतिबिंबित करतात आणि लोकांना प्रेरणा देतात.चला चला या पोस्टमध्ये वाचूया Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi.
आज digitaltechnodiary.com मंचावर आपण एक महान विव्दा्न नेते, भारताचे सामाजिक कार्यकर्ते , बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचे मराठी मधील बहुमोल विचार वाचू . डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा , dr.Babasaheb Ambedkar jayanti Quotes, Dr.Babasaheb Ambedkar Whatsapp status Quotes in Marathi. जे तुम्ही तुमच्या सोशल मिडीया स्टेट्स वर वापरू शकता .
दरवर्षी 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण यावर्षी कोरोनामुळे आंबेडकर जयंती नेहमीप्रमाणे भव्य स्तरावर साजरी होण्याची शक्यता कमी आहे, अशा परिस्थितीत आपण बाहेर पडू शकत नाही, परंतु आपण आपल्या प्रियजनांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा पोहचवू शकतो.
कोणत्याही समाजाची
उन्नती समाजाच्या
प्रगतीवर अवलंबून असते
अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी
बनलं पाहिजे
देवावर भरवसा ठेवू नका
जे करायचे ते
मनगटाच्या जोरावर करा
आकाशातील ग्रह व तारे हे जर
माझे भविष्य ठरवतील
तर माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा
काय उपयोग
ज्यांना काम
करण्याची आवड
आहे त्यांना
संधी द्या आपसात
भांडणे नकोत
काम लवकर करायचे असेल
तर मुहूर्त
पाहण्यात वेळ घालवू नका
बोलताना विचार करा
बोलून विचारात
पडू नका
तुम्ही वाघासारखे
बना म्हणजे तुमच्या
वाट्याला कोणीही
जाणार नाही
जनामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका
या जगाला काहीतरी करून दाखवायचे आहे
अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे
लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा
प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक
होण्यासाठी तयार असतो
तुम्ही किती अंतर
चालत गेलात
यापेक्षा तुम्ही कोणत्या
दिशेने जात आहात
हे अधिक महत्त्वाचे आहे
हक्क मागून मिळत नसतो
त्यासाठी तुम्हाला
संघर्ष करावा लागतो
माणसाला आपल्या
दारिद्रयाची लाज वाटता कामा नये
लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची
सेवा जवळून आदर दूरून ,
आणि ज्ञान आतून असावे
अग्णीतून गेल्याशिवाय
माणसाची शुध्दी
होत नाही
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा
छोट्या गोष्टीने आरंभ करणे
अधिक श्रेयस्कर ठरतो
चुकीच्या निर्णया विरोधात
जाहीर बंड करण्याची धमक
ज्यांच्यात असते…
त्यांच्यात स्वतःच अस्तित्व
निर्माण करण्याची देखील
धमक असते….
एकट पडण्याची भिती
त्यांनाच असते
ज्यांना गुलाम म्हणून
जगायची सवय असते….
नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा
आंबेडकरांचे धर्मा संबंधी विचार
मला स्वातंत्र्य समानता
आणि बंधुत्व
शिकवणारा धर्म आवडतो
सर्वात आधी आणि सर्वात शेवटी
आपण एक भारतीय आहोत
माणूस धर्मासाठी नाही
तर धर्म हा
माणसांसाठी आहे
मी अशा धर्माला मानतो
जो समता , बंधूता आणि
स्वातंत्र्य देऊ शकेल...
जेथे एकता तेथेच
सुरक्षितता
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे “हुकूमशाही “
आणि माणसा माणसांत भेद मानणारी संस्कृती
तुमच्या मताची किंमत मीठ-मीरची
इतकी समजू नका त्यातील सामर्थ्य
ज्यादिवशी तुम्हाला कळेल ,तेव्हा ते
मत विकत होऊ पाहणाऱ्यांइतके
कंगाल कोणीच नसेल
अस्पृश्यता जगातील सर्व
गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे
ज्या वर्गातील महिलांची
प्रगती अधिक झाली
तो वर्ग मी अधिक
प्रगतीशील मानतो
आंबेडकरांचे शिक्षणा संबंधी विचार
शिका !
संघटित व्हा !!
संघर्ष करा !!!
बुध्दिमत्तेचा विकास हे
मानवी अस्तित्वाचे
अंतिम लक्ष असले पाहिजे
लक्षात ठेवा
तलवारीच्या धारे पेक्षा
लेखणीची धार कायम
टिकणार आहे आणि सर्वात
खतरनाक शस्त्र आहे
म्हणून तलवारी हातात न घेता
लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा
जो धर्म
अशिक्षिताना अशिक्षित रहा
निर्धनांना निर्धन रहा
अशी शिकवण देतो
तो धर्म नसून ती शिक्षा आहे
शील ,करूणा ,विद्या ,मैत्री ,प्रज्ञा
या पंचतत्वावर
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र
बनविले पाहिजे
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे
आणि जो
ते प्राशन करेल तो
वाघासारखा गुरगुरल्या शिवाय
राहणार नाही
स्वतःची लायकी
विद्यार्थी दशेतच वाढवा
जर तुमच्याकडे दोन
रुपये असतील तर एक
रुपयाची रोटी घ्या आणि
एक रुपयाचे पुस्तक घ्या
रोटी तुम्हाला जगण्यास
मदत करेल तर
पुस्तक तुम्हाला जगावे
कसे ते शिकवेल
शिला शिवाय
शिक्षणाची
किंमत शून्य आहे
करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो
पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात
भर टाकित जाणे यापेक्षा
अधिक सुख दूसरे काय असू शकते
ग्रंथ हेच गुरु
वाचाल तर वाचाल
माणसाने जन्मभर जरी शिकायचे
मनात आणले तरी
विद्यासागराच्या कडेला गुडगाभर
ज्ञानात जाता येईल
मला माणसांच्या सहवासापेक्षा
पुस्तकांचा
सहवास अधिक आवडतो
साऱ्या देशाला एका भाषेत
बोलायला शिकवा
मग बघा काय चमत्कार घडतो ते
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत
एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची
शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे
शिक्षण ही पवित्र संस्था आहे ,
शाळेत मने सुसंस्कृत होतात ,
शाळा म्हणजे नागरिक तयार
करण्याचे पवित्र क्षेत्र आहे
सचोटी आणि बुध्दिमत्ता
याचा संगम झाल्याशिवाय
कोणत्याही माणसाला
मोठे होता येणार नाही
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ,
ही एक तपश्चर्या आहे ,तिला मनः संयमाची
आणि नियंत्रणाची सवय करावी लागते
मी समाजकार्यात ,राजकारणात
पडलो तरी ,
आजन्म विद्यार्थीच आहे
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका
सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षिण
हेच एकमेव औषध आहे
धर्म हा जर कार्यवाहीत राहायचा असेल
तर तो बुध्दिनिष्ठ असला पाहिजे
कारण शास्त्राचे स्वरूप बुध्दीनिष्ठ हेच होय
शिक्षक हा शालेय असो ,
महाविद्यालयीन असो की ,
विद्यापिठिय असो त्याचे कर्तृत्व
उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना
अनुकरणीय वाटले पाहिजे
शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा
मार्ग आहे हे जाणून
विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा
आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे
बाबासाहेबांनी शिक्षणाचा पायाभूत
विचार करतांना….
ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही
त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा
असे म्हटले
Dr . Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi / डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आले किती…
गेले किती....
उडून गेला भरारा….
संपला नाही आणि
संपणार ही नाही
माझ्या भिमाचा दरारा
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
कोणालाही जमणार नाही ,
अशी क्रांती करून दाखवली…
जातीयवादाला देऊन टक्कर ,
चवदार ओंजळ भरून दावली
निसर्ग नियमाप्रमाणे ,
पाणी आग विझवते ,
पण माझ्या भीमाने तर
पाण्यालाच आग लावली
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आज आमचे जे
काही आहे
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूख ही तहान
सर्व पुन्याई तुझीच आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी
अहोरात्र कार्य करून
सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरासारख्या महापूरूषाच्या
जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा
सजली अवघी पाहण्या
तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
विश्वरत्न ,विश्वभूषण ,
भारतरत्न ,महाविद्वान ,
महानायक ,अर्थशास्त्री ,
महान इतिहासकार ,
संविधान निर्माता ,
क्रांतीसुर्य ,युगपुरुष
परमपूज्य बोधीसत्व,
महामानव ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी प्रणाम
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे…
घाबरू नकोस कुणाच्या बापाला
तु भिमाचा वाघ आहेस….
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
चांदण्यांची छाया कापराची काया
माऊलीची माया माझा भिमराया
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
Ambedkar jayanti Whatsapp status Quotes in Marath
सागराचे पाणी कधी
आटणार नाही
“बाबांची” आठवण कधी
मिटणार नाही
हा जन्म काय हजार जन्म
झाले तरी
नाद हा “भिमाचा” सुटणार नाही
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
धरती आभाळाशिवाय
झाकत नाय आणि
भिमसैनिक बाबासाहेबांशिवाय
इतर कुणापुढे झुकत नाय
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
नमन त्या परक्रमाला
नमन त्या देश प्रेमाला
नमन त्या ज्ञानदेवतेला
नमन त्या महापुरूषाला
नमन अशा आपल्या
बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
कोणाचा जन्म कोणाला काय
देऊन गेला…..
फक्त बाबासाहेबांचा जन्म
आम्हाला न्याय देऊन गेला
जनावरांसारखे होते जीवन
तो “माणूस” बनवून गेला
आम्ही होतो गुलाम ,
आम्हाला बादशाह बनवून गेला..
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
अन्न तर होत पण ..
भाकर देणारा एकच होता
पाणी तर होते पण..
पाजणारा एकच होता
मेलो असतो आम्ही गुलामी करून
पण जीवाला जीवाचे दान देणारा
माझा भीमच होता
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आकाशात एक निळा तारा
आपला असावा..
थकलेले डोळे उघडताच
निळा झेंडा चमकून दिसावा ,
एक छोटीशी दुनिया
आपली असावी
या दुनियेत नेहमी
माझ्या भीमाची मुर्ती दिसावी…
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
समता स्वतंत्र विश्वबंधुत्व
लोकशाही या तत्वात
ज्ञान रोविले मुल्य दिले
महामानवाने जीवनात
चेहरा त्यांचा त्या शब्दात
आजही दिसतो संविधानात
उगवता सुर्य भारतरत्न
लाभले डॉ बाबासाहेबात
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी
तो रात्रंदिवस झुरला होता
दलितांच्या अंधारी दुनियेत
तो एकटाच सुर्य ठरला होता
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला बापाचा दर्जा”
“कारण ...एकटाच भिमराव सर्वांना पूरून उरला होता”
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
0 Comments: