होळी शुभेच्छा 2021-Happy holi wishes,status images,Quotes
होळीच्या आगमनानंतर प्रत्येकाच्या मनात एक विलक्षण ऊर्जा असते. होळी साजरी करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. होळीच्या या शुभ प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावतात. जेव्हा एखाद्याला रंग लावल्यानंतर वाईट वाटते किंवा राग येतो तेव्हा लोक विनोदाने म्हणतात की “बूरा न मानो होली है”.होळीचा सण साजरा करण्यामागे भक्त प्रल्हादाची मोठी कहाणी आहे,
हिरण्यकश्यपू यांच्या मुलाचे बोल ऐकून सिंह का घाबरला? प्रल्हाद भगवान विष्णूचे उत्कट भक्त होते. वडिलांनी लाख बोलूनही प्रल्हाद विष्णूची भक्ती करत राहिला. असुर मुलगा असूनही नारद मुनींच्या शिक्षणामुळे प्रल्हादा एक महान नारायण भक्त झाला. असुरधिपती हिरण्यकशिपने पुत्रालाही ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु खुद्द देव स्वत: त्याचे रक्षण करीत राहिला.
असुर राजाची बहीण होलिका यांना भगवान शंकरांकडून अशी चादर प्राप्त झाली होती जेव्हा ती आच्छादित असतांना अग्नी तिला जाळू शकत नाही. होलिकाने ती चादर स्वतःवर ओठली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीच्या अग्णीमघ्ये बसली, श्नी विष्णू च्या कृपेने ती चादर उडून प्रल्हाद वर आली, ज्याने प्रल्हादाचे प्राण वाचवले आणि होलिका जाळली. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटाच्या प्रतीचे चांगले प्रतीक आहे.वाईट गोष्टींवर विजय मिळवणे हि या सणाची व्याख्या आहे.
आज आम्ही या होळीच्या निमित्ताने या लेखात काही Happy holi sms ,happy holi message , होळी शुभेच्छा images, होळी शुभेच्छा 2021 ,होळी ग्रीटिंग 2021आणि होळी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ज्यांना आपण आपल्या नातेवाईक, मित्र आणि कुटूंबियांसह व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यामातून सामायिक करू शकता आणि त्यांना होळी हार्दिक शुभेच्छा
रंग न जाणती जात आणि भाषा
उधळण करुया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया रंगाचे मळे….
रंगात रंगले जीवन…
हर्षात फुलले मन….
ह्रदयी उरले प्रेम…
अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…
पिचकारीचे पाणी ,
अन रंगाची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची
अशी अनोखी कहाणी
मुठीत रंग ,मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्नीरंग रंगू दे
राघे आज होळी खेळू दे
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षम तरंग
अग नाच नाच राधे उडवू या रंग
रंगामधी भिजलं तुझ गोरं गोरं अंग
वसंताच्या आगमणासाठी
वृक्ष नटले आहेत ,
जुनी पाने गाळून
नवीपालवी मिरवीत
रंगाची उधळण करीत
जुने नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून
उधळू त्यांना नभी चला
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष….
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद….
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास ,
प्रेमाचा एक रंगच बस पुरेसा….
अमर ढेबरे
उधळू त्यांना नभी चला
आला रंगोत्सव हा आला
रंगात होळीच्या रंगुया चला
रंग नात्यांचा
रंग बंधाचा
रंग हर्षाचा
रंग उल्हासाचा
साजरा करु होळी संगे..
रंग नव्या उत्साहाचा
होळी दरवर्षी येते
आणि
सर्वांना रंगवून जाते
ते ऱग तर निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग
तसाच राहतो
तनामनावर उमटले आज रंगाचे तरंग
रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेला संग
उधळू मुक्त भावना आज रंगाच्या समवे
परस्परांवर प्रित जडावी,विसरु रुसवे फुगवे
रंगाच्या दुनियेत सर्व दंगले
रंग बिरंगी रंगात
चिंब चिंब ओले झाले
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी
रंगछटांबद्दल शुभेच्छा
भेटीलागी आले,रंगाचे सोयरे।
म्हणती काय रे,रंग तुझा ।
वदलो बा माझी,
पाण्याचीच जात,भेटल्या रंगात मिसळतो।
गुरु ठाकूर
सोडूनी भेद नी भाव
विसरून दुःखे नी घाव
रंग सारे मिसळूया चला
रंगात होळीच्या रंगूया चला
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंघ
आनंदाचे रंग
तुमच्या आयुष्यात कायम येत राहो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आनंदाचा क्षण
रंगाची उधळण
आनंदाचे रंग,तुमच्या आयुष्यात
कायम येत राहो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पोर्णिमेचा चंद्र, रंगाची डोली
चंद्राला त्याची चांदणी म्हणाली
सुखाने भरून निघू दे तुमची झोळी
राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारी
प्रेमाच्या रंगानी रंगू दे दुनियासारी
ये रंग न जाने कोणती जात न बोली
नारंगी रंग पळसाच्या फुलांचा
गुलाबी रंग हा गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेका होवूनिया दंग
प्रेमाचा रंग उधळू दे
नात्यांमध्ये रंग आणि
तुमच्या जीवनात खुशीची
बहार आनंदाने भरून निघू दे
आम्रतरुवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगाची उधळण होई
होळी जीवन गाणे गाई
भिजू दे रंग अन अंग स्वछंद
अखंड उठू दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग
रंगून जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध
असे उधळूया आज हे रंग
आज घराघरात पूरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे
लावू रंग गुलाल भाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
लाल रंग तुमच्या गालांसाठी
काळा रंग तुमच्या केसांसाठी
निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी
पिवळा रंग तुमच्या हातांसाठी
गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी
पांढरा रंग तुमच्या मनासाठी
हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी
होळीच्या या सात रंगांसोबत
तुमचे जीवन रंगून जावो…..
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्साहाचा साजरा करु होळी संगे….
आला आला रंगोत्सव आला…..
चला बागामंदी रंग खेळू चला….
रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ,
आयुष्यात राहू दे सर्व रंग
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी…
वसंत ऋतू फुलला आज सजणीच्या मनी
रंगाची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रितीची बेल फुलली गाती आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
एक हिरवा स्पर्श मी तुला पाढवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा थेंब पाढवला
प्रेमाच्या उदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण
रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाढवली आहे
इंद्रधनूच्या रंगासोबत तुम्हाला पाढवल्या
आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम आनंद उल्हासाचा
होवो वर्षाव
ह्याच होळीच्या शुभेच्छा
लई लई भारी
मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
आज होळी आली रे
राग-व्देष ,मतभेद विसरु
प्रेम, शांती चहुकडे पसरु
होळी इडा पीडा जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
उत्सव रंगाचा,पण रंगाचा बेरंग करू नका
नैसर्गिक रंगाचाच वापर करू
प्राण्यांना रंग लावून त्रास देवछ नका
रंगानी भरलेले फुगे मारून इजा करू नका
0 Comments: