गुढी पाडवा शुभेच्छा 2023 ।Gudi Padawa Quotes in Marathi
गुढी पाडवा शुभेच्छा 2023 ।Gudi Padawa Quotes in Marathi
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो . शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.यादिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ ,सुवर्ण खरेदी अशा गोष्टी केल्या जातात ,दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे, असे मानले जाते, गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.
कृषी दिनदर्शिकेत वसंत ऋतू साजरा करण्याच्या भोवती फिरणारा हा सण रब्बी पिकाच्या पहिल्या कापणीचे चिन्ह आहे. पूरणपोळीची पारंपरिक तयारी करून महाराष्टीयन गुढीपाडवा साजरा करतात.
उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.
गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.
गुढी पाडवा निमित्त तुमच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना पाठविण्यासाठीचे खास गुढी पाडवा शुभेच्छा , Gudhi Padawa Whatsapp status , गुढी पाडवा शुभेच्छा 2023, Gudi Padawa Quotes In marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर करू शकता.
वाचा - प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मदिन 'रामनवमी'ला पाठवा हे शुभेच्छा संदेश
Happy Gudhi Padawa Quotes in marathi | गुढी पाडवा शुभेच्छा 2023
सूर्य संवेदना पुष्पे,
दीप्ति कारुण्यगंधने|
लब्ध्वा शुभं नववर्षेऽस्मिन
कुर्यात्सर्वस्य मंगलम् ||
🙏धन्यवाद.... असाच सहवास
तुमचा आयुष्यभर लाभो...
चुकून जर मन दुखवलं असेल तर
मोठ्या मनाने क्षमाकरा......
ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष
हसतखेळत आनंदात गेले
त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत.
त्यामध्ये तुम्हीही आहात.
तुमचे मन:पुर्वक आभार ! पुढील वर्षी
आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. दिनांक २२/०३/२०२३ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा
चैत्राची सोनेरी पहाट ,
नव्या स्वप्नांची नवी लाट…
नवा आरंभ नवा विश्वास ,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात….
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नक्षीदार कठीवरी रेशमी वस्त्र
त्यांच्यावर चांदिचा लोटा
उभारुनी मराठी मनाची गुढी ,
साजरा करुया हा गुढीपाडवा ,
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….
चंदनाच्या काठीवर शोभे सोण्याचा करा…!
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा…!
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण…!
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
उंच आकाशात घेऊन भरारी ,
गुढी उभी राहिली प्रत्येक दारी…
सुशोभित अंगणी आज ,
दौडत आली नववर्षाची स्वारी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
साडेतीन मुहूर्ताचे
वलय आहे !
उत्तम दिनाचे महात्म आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असू दे
अवीट हा गोडवा !!
पवित्र पाडवा, शुभ पाडवा !
नवी स्वप्न ,नव्या आशा ,
नवि उमेद आणि नाविण्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण होवोत
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा |Happy GudhiPadawa wishes in Marathi
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुडी….
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळसाखरेची गोडी...
उंचच उंच उभारल्या गुढी ,
जपूया आपल्या मातीतील
परंपरा रुढी,
नात्यांची बसवूया नीट घडी ,
विसरून जाऊ मनातील सर्व अढी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रसन्नतेचा साज घेऊन ,
येवो नवीन वर्ष ,
आपल्या जीवनात नांदो….
समृद्धी ,समाधान आणि हर्ष ,
गुढीपाडव्याच्या आपल्याला लक्षलक्ष शुभेच्छा
क्षण मोलाचे घेऊन आली ,
वेचून घेवू ते क्षण सारे…
आनंदे करू नवं वर्ष साजरे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ , नवा विश्वास ,
नव वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आशा आकांक्षांचे बांधून तोरण…
समृद्धीची गुढी उभारु द्वारी
गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
संस्कृतीच्या क्षितिजावर ,
पहाट नवी उजळून आली ,
आयुष्यात पुन्हा नव्याने ,
क्षण मोलाचे घेऊन आली ,
वेचून घेऊ क्षण ते सारे
आनंदे करु नववर्ष साजरे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी प्रेमाची उभारुया दारी
औचित्य शुभमुहूर्ताचे करुनि…
विसरुनी जावू दुःख सारे
स्वागत करुया नववर्षाचे प्रेमभरे…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या व्हाँट्अँप स्टेटस | Gudhi Padawa Whatsapp status
श्रीखंडाची लज्जत ,
गुढी उभारण्याची लगबग ,
सण आहे आनंदाचा आणि सौख्याचा ,
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
मागील वर्षास
अभिवादन करा आणि
नवीन वर्षाचस सलाम करा
गुढी पाडव्याला
आनंदोत्सव साजरा करू द्या
आणि
नव्याने सुरवात करु द्या !
गुढीपाडव्याचे अभिनंदन !
श्रीखंड पूरी
रेशमाची गुढी
आणि. लिंबाच पान…
तुम्हा सर्वांना नववर्ष जावो
एकदम छान !
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
स्वागत करुया नववर्षाचे ,
उभारुनी उंच गुढी ….
भरून वाहो सुखांनी ,
प्रथम मुहूर्ताची आनंदघडी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
एक नवी सुरुवात ,
आज पुन्हा एकदा करु….
करु स्वागत सुखाचे ,
अक्षरे प्रेमाची पुन्हा गिरवू…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुर्य तोच ,
पर्व नवे ,
शब्द तेच ,
वर्ष नवे ,
आयुष्य तेच ,
अर्थ नवे ,
यशाचे सुरू होवो किरण नवे…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे…
प्रत्येक संवेदनेला जगून पहावे…
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना…
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गाठीच्या माळा ,लिंबाचं लोणं ,
समवेत नऊवारी साडी ,
निळ्या नभात लहरे उंचच उंच विजयाची गुढी…
पाडव्याच्या सणाचा असा हा अनोखा थाट ,
करूनिया वंदन गुढीला , या शुभ मुहूर्तावर
चालू प्रेमाचीच वाट…..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षामागून वर्ष जाती
बेत मनीचे तसेच राहती
नव्या वर्षी नव्या भेटी ,
नव्या क्षणाशी नवी नात ,
नवी पहाट तुमच्यासाठी
शुभेच्छांची गाणी गाती !
Happy Gudi Padwa
जुन्या दुःखांना मागे सोडून
स्वागत करा नवं वर्षाचे
गुढी पाडवा घेऊन येतो क्षण
प्रगती आणि हर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
उभारून आनंदाची गुढी दारी ,
जीवनात येवो रंगत न्यारी ,
पूर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारून आकाशी ,
बांधून तोरण दाराशी ,
काढून रांगोळी अंगणी ,
हर्ष पेरूनी मनोमनी ,
करू सुरुवात नववर्षाची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडवा शुभेच्छा 2021 | Gudi padawa 2021 wishes in marathi
नवीन पल्लवी वृषलतांची ,
नवीन आशा नववर्षाची ,
चंद्रकोरही नवीन दिसते ,
नवीन घडी ही आनंदाची ,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
झाडावर नवीन पाने
आली आहेत ,सर्वत्र
हिरवळ आहे !
गुढी पाडवा आला ,पहा
सर्वत्र आनंद आहे !
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदाची उधळण करीत
चैत्रपंचमी दारी आली
नव्या ऋतूत नव्या जीवनात
उत्साहाची पालवी फुलावी
कडुनिंब दुःख निवारी
साखर सुख घेऊन येई
पानाफुलाचे तोरण बांधून दारी
इच्छा आकांक्षांची गुढी
उभारु या आपल्या दारी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवेपण देऊन गेला..
ज्याने नवीन वर्षाची सुरवात ही अशीच केली ,
नाविण्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पडता दारी पाऊल गुढीचे ,
आनंदी आणि मंगलमय होई जग सारे ,
या सणाला करु आनंदाचा जल्लोष
कारण ,आले आहे हिंदू नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी मराठी संस्कृतीची
गुढी मराठी अस्मितेची !
आपणास व आपल्या परीवारास
हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या ,तोरणे सण उत्सवाचा
चला साजरा करूया सण
गुढीपाडव्याचा !
वसंतस्थागमे चैत्रे
वृक्षाणां नव पल्लवाः !
तथैव नववर्षेडस्मिन्
नूतनं यश आप्नुहि !
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला दारी ,
घेऊन शुभेच्छांची वारी
तुम्हाला जाओ नववर्ष छान
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी
चैतन्य असेल तिथे ...आनंदात असतील सारी
मनी मात्र तुझ्या माझ्या आठवणींची सभा आहे
एकटाच गुढी आणि मी ही एकटाच उभा आहे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आशेची पालवी , सुखाचा मोहोर ,
समृद्धीची गुढी , समाधानाच्या गाठी ,
नववर्षाच्या शुभेच्छा ,तुमच्यासाठी…
सुख-दुःखाप्रमाणेच गुढीतही आहे
कडू गोड चवीचा मेळ…
तसाच आहे जीवनाचा हा खेळ
पुन्हा घेऊ नवा ध्यास आणि
सुरवात करु या नवीन वर्षाला खास
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी ,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपरिक रूढी ,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण ,
प्रफुल्लित होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सोन पिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष
मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चारी दिशांना आनंदाची आहे बहार…
गोड श्नीखंड आणि पुरीचा आहे स्वाद…
दारी सजली आहे रांगोळी…
असमंतात आहे पतंगाची झळाळी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
वसंत ऋतूच्या आगमनी ,
कोकीळा गायी मंजुळ गाणी
नव वर्ष आज शुभ दिनी ,
सुख समृद्धी नांदो जीवनी
गुढीपाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार
हिरवळीने सुगंधीत झाली आहे
निसर्ग अपरंपार… चला उभारुया गुढी
आनंदाची आणि समृद्धीची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आनंद होवो ओव्हरफ्लो….
मस्ती कधीही न होवो लो…
धनधान्याचा होवो वर्षाव…
असं जाओ तुम्हाला
नववर्षाचं पर्व
वसंताची पहाट घेऊन आली ,
नवचैतन्याचा गोडी…
समृद्धीची गुढी उभारा
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padawa Quotes in Marathi for family and friends
प्रेम आणि विश्वासाने बांधलेली गुढी
सोडवू शकते कुढलीही आढी
उभारा गुढी तुमच्या दारी
सुख समृद्धी येईल तुमच्या घरी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट…
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी.. नववर्षाची सुरवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पुन्हा एक नवीन वर्ष ,
पुन्हा एक नवीन आशा ,
तुमच्या कर्तृत्वाला ,
पुन्हा एक नवी दिशा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येत वर्ष जात ,
पण प्रेमाचे बंध कायम राहतात ,
आपलं नात असं दरवर्षी वृद्धिंगत
व्हाव हीच सदिच्छा ,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दुःख सारे विसरून जाऊ ,
सुख देवाच्या चरणी वाहू ,
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी ,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
शांत निवांत शिशिर आला ,
सळसळता हिरवा वसंत आला ,
कोकीळेच्या मंजुळ स्वरांसोबत
चैत्र पाडवा दारी आला…
नुतन वर्षाभिनंदन
पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या द्वाने फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्षे नवे…
नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments: